Tuesday, September 1, 2009

वचन..


जाईन मी जेंव्हा खूप दूर
देशील का एखादी हाक परतून
आठवशील का कधी परत मला
तुझ्या भूतकाळाच्या सागारातून..
रोजचेच आपले भांडण आणि रोजचाच परत एकोपा
किती आतुर असायचीस तू माझ्या एका call ला
पावसात भिजताना shopping करताना
आठवशील का कधी मला Silent Songs ऐकताना..

कधी पाणीपुरी तर कधी पावभाजी
ऐश्वर्या पेक्षा दीपिकाच भारी
न संपणारे हे timepass talking
आठवशील का कधी while walking...

जातील दिवस सरून, कधी कळणार नाही
वाटा होतील वेगळ्या, कधी उमगणार नाही
नशिबाकडून सगळे मिळेल कदाचित
पण त्या सगळ्यात तू अन मी नाही...

खरे सांगू, नको कधी आठवू काही
तुझ्या डोळ्यातले अश्रू मला आवडणार नाही
तू सुखी राहा यातच सर्व काही आहे
मनाचे माझ्या सोड गं, ते सदा आशाळभूतच आहे..

आठवणीना उराशी बाळगून
निरोप मी घेईन खरा
"विसरणार नाही कधी तुला"
एवढेच वचन हवंय मला....

- अतुल

2 comments:

मीनल said...

kiti divasanni post takali?
chhan aahe.

नेत्रा..... said...
This comment has been removed by the author.