Tuesday, March 17, 2009

कधीतरी वाटते...


कधीतरी वाटते, खुप लिहावे,
लिहिता लिहिता शब्दात गुंतावे...

कधीतरी वाटते, खुप हसावे,
हसता हसता हळूच खुलावे...

कधीतरी वाटते, कोणास आठवावे,
आठवणीत त्या थोडेसे ZUरावे...

कधीतरी वाटते, हे असेच रोज वाटावे,
सुखांच्या स्वप्नात बापड्या मनास हरवावे...

कधीतरी वाटते.........
-अतुल




Friday, March 13, 2009

कॉलेज चे दिवस...


आठवतात का मित्रा तुला कॉलेज चे ते दिवस...
बंक मारलेली लेक्चर्स अणि प्रॉक्सी ची ती चुरस

टपरीवरचा वडापाव आणि कैंटीन चा तो कटींग,
आठवतात का सांग तुला, त्या टेरेस वरच्या मीटिंग्स...

सरांचा तो लुक तर मैडम ची ती अदा,
होतास ना रे तू पण त्यांच्यावरच फ़िदा...

आठवतात का त्या आपल्या सबमिशन च्या नाइट्स
GT पकडल्यावर कशी फाटली होती वाईट...

चोरून पाहिल्यावर तिची खुललेली ती khali
साला तिथेच तर गेला होता आपल्या दिलाचा बळी

फेरवेल ची ती पार्टी म्हणजे स्वातंत्र्याचा अंत,
चेहरयावरचे हसू तर दाटलेला तो कंठ...

आज विचार करता नाही कोणी त्या ठिकाणी,
सरले ते दिवस ... राहिल्या फ़क्त आठवणी........

- अतुल