Friday, July 10, 2009

फुला रे फुला......


सांग रे फुला तुला गंध कोणी दिला,
नजरेत भरावा असा रंग कोणी दिला,
जाई जुई गुलाब मोगरा,
रुबाबात नटलेला बहुरंगी झर्बेरा,
रुपे तुझी अनेक नवे तुझी अपार,
खऱ्या प्रेमाचा तूच एक साक्षीदार,
वाऱ्यासवे झुलतोस तू,
मनाला किती भावतोस तू ,
प्रेयसीची खळी देखील खुलावतोस तू ,
काय सांगू हेवा तुझा वाटतो मला,
खर सांग,
माझ्या आधी तिच्या हृदयात तुला चान्स कोणी दिला??
फुला रे फुला......